||ग्रामगीता||
मंत्र-गुरुदेव, धर्म मानव, पंथ सामुदाईक प्रार्थना ,भक्ती- ग्रामसेवा ,

)ओम नमोजी विश्वचालका   |जगतवंध्य ब्रम्हांडनायका
एकची एकची असोनी अनेका |भाससी विश्वरूपी ||१||
] आपणची मंदिर मूर्ती पुजारी | आपणची पुष्पे होऊनी पूजा करी ||आपणची देवरूपे अंतरी |पावे भक्ता |\||
|>१ पासून ते १० \१२ --| पर्यंत विश्वव्यापक रचना केली . अशी विश्वात्मक भावना असताना सत्य लपले कोठे हाच मोठा प्रश्न आहे
]पुण्यक्षेत्र पंढरपुरी |बैसलो असता चंद्रभागे तीरी ||
स्पुरू लागली ऐसे अंतरी |विश्वाकार वृत्ती  |\४४ ||
--|दगडाच्या देवाने ग्रामगीता लिहिण्याची स्पुर्ती दिली आणि त्यांच्या विरोधात सिद्धांत मांडलेत हे नवलच आहे. मूर्ती पूजेच्या विरुद्ध अनेक भजने लिहिली आहेत , आणि हा स्वमत सिद्ध करण्या करिता केलेला  विरोध आहे असे मला वाटते.  कारण महाराजांच्या प्रत्येक लिखाणातून ब्राम्हण आणि शास्त्र यांचा तिरस्कार दिसून येतो      
] विशालता गेली मानवाची |रचना केली जाती पंथाची ||
कामाची होती ती कायमची |विभागणी माथी बैसली |\५९||
चातु चातुर्वर्ण्यं मया सृष्टम ,गीता,,, हि समाज व्यवस्था आहे काळ परत्वे यात बदल झाले आहे
आणि महाराजांनी वर्ण व्यवस्था अ ५ वा मध्ये सुंदर समन्वय साधला आहे  
]विश्वब्रम्ह बोलत गेला |सभोवती समाज दुखी बुडाला |
ग्रामसेवाही न कळे ज्याला | त्याचे ज्ञान व्यर्थची |\७२ ||
भक्तीचे अनेक प्रकार आहेत .ग्राम सेवा नाही झाली म्हणून  त्याचे ज्ञान व्यर्थ असे म्हणणे चुकीचे नाही का?
आपापल्या पद्धतीने सर्वच भक्त समाज सेवा करतात हे लक्षात घ्यायला पाहिजे
]माझी मला साक्ष आहे |मी ग्रंथकरता विद्वान नोहे ||
परी धान्यराशीत आपुले पोहे |टाकावे वाटती |७६ ||
हे धान्य राशीत पोहे नाहीत दुधात मीठ आहे.

]आपुले गाव उन्नत करावे |सकल लोक हाती घ्यावे ||
यासी देवाचे गोडवे |गावेत कासयासी ?||८६ ||
असे मूर्खपणाचे प्रश्न बरेच आहेत. आणि याचे समाधानहि केले ,

]आम्ही मुख्यता कार्यप्रेरक |चालती आम्हा ऐसे नास्तिक ||
ज्यांचा भाव आहे सम्यक | सुखी व्हावे सर्व म्हणुनी ||१०६ ||
भलेही तो देव न माने |परी सर्वा सुख देऊ जाणे||
 मानवासी मानवाने |पूरक व्हावे म्हणूनिया |||१०७ ||
हे सारे गावाचे धन |असे काया वाचा,बुध्दी प्राण |
ऐसे असे जयाचे धोरण |तो नास्तिकही प्रिय आम्हा ||१११||
तो तत्त्वतः नास्तिकची नोहे |जो सर्वांसी सुखविताहे |
तो देव देव जरी न गाये |तरी देवसेवाची त्या घडे ||११२||
            अध्याय  २रा
]अनेक प्राणी जेथे राहती |त्या सर्वाची राहावी सुस्थिती |
  समान समाधानाची गती |त्यास धर्म म्हणावे ||||  
  *नको सत्तेचा बडगा त्यासि |नको दंडभय सत्कर्मासी  |
  आपापले कर्म सर्वासी |धर्म शिकवी सर्वागे ||१०||
  धार्मिक त्यासची म्हणावे |सत्तेवाचुनी वागे बरवे |
  स्वये आपुल्याची स्वभावे |समरस होई सर्वाशी ||११||
  नको वैद्य अथवा डॉक्टर |आपणची राहे आरोग्यतत्पर|                                                                                                                                               नको वकील न्यायाधीश दंडधर |न्यायव्यवहार सहजची ||१२||
  नको धार तरवारीचा|चुकीस्तव तळमळे आत्मा साचा |
  साक्ष देतो अंकुर देवाचा |अंतरामाजी ||१३|| 
  ऐसे ज्याचे ह्दयी स्फुरण |तोची खरा धर्मवन |
  बाहय अवंडबर धर्मचिंन्ह  |ते ते गौन,धर्म नव्हे ||१४||
अ ८ मध्ये काय सांगतात ते पहा.. स्वमत निर्णय
परंतु भयावाचुनी काही लोक |न एकतीच बोध सम्यक |
दंडांविन जैसे पशु देख |न चालतीच योग्य मार्गे ||१६ ||
त्यांना हित कोणी शिकवावे?|कोणी मूर्खाचे हृदय धरावे ||
म्हणोनी सत्तेने सरळ करावे |ऐसा मार्ग वाढवा ||१७ || 
 
*मानव पशुयोनीतून आला |नराचा नारायण होणे त्याला ||
यासाठी संस्कार देऊनी सावरीला |क्रमाक्रमाने ||\२८ ||
महाराजांना डार्विनचा उत्क्रांती वाद मान्य आहे असे समजावे का?

यासाठी धर्मे नेमिले संस्कार |आश्रम गोविले जीवनी चार ||
आयुष्य कल्पुनी वर्षे शंभर |विभागिले ते उन्नतीस्तव ||३१ ||
-[अति उत्तम व्याख्या केली आहे, शास्त्रशुद्ध वचन
या अगोदर काय म्हणतात विशालता गेली मानवाची |रचना केली जाती पंथाची ||
शास्त्र संमत असतांना स्वमत मांडणे.शास्त्र खोटे ठरविणे हा त्यांचा स्वभावच होता असे म्हणावे लागेल
उदा;-आठ वर्षाचे आतची त्याला |पाहिजे उपनयन संस्कार केला ||
तोही नको रुढीचा बांधला |नाटक नुसते बटूचे ||४८||
शास्त्राने सागितले ते बटूचे नाटक आहे
महाराज म्हणतात ते खर [ग्रामगीता]
उपनयन म्हणजे विद्येचे व्रत|ब्रम्हचर्याश्रमची सुरुवात |
गुरुजवली करणे समर्पित |जीवन त्याचे घडवावया ||४९||

बसवू नये मुलीसह शिक्षणी |तेथे संमिश्र नाटके कोठोनी ?|
स्त्रेणासंगती शृंगारगायनी|क्षणभरीही बसो न दयावे ||६४||
अध्याय ३रा
निपुत्रिकास अधोगती |ऐसे जे ग्रंथवेत्ते म्हणती |
त्यांच्या म्हणण्याची निष्पत्ती |दुसरी होती ||७५||
भारती ऐसा काळ आला |संन्यासी देती ज्याला त्याला |
महत्त्व न दयावे लग्नकार्याला |ऐसे झाले ||७६||
ज्याचे त्याने तप करावे |ऐसे धरले बहुतांच्या जीवे |
म्हणोनी हे बंधन घालावे |लागले ग्रंथकर्त्या ||७७||
पुत्र व्हावा कुल-उदधारी |एरव्ही ती वांझची बरी |
ऐसेही बोलिले निर्धारी |ग्रंथामाजी ||७८||
यातुनी हाच निघे सार |समाज धारणेसाठी संसार |
पुत्र नसताही होतो उधार |प्रयत्नशील गृहस्थाचा ||७९ ||

मन काढावे घरातुनी |पुत्रास जबाबदारी समजुनी ||
पुत्र नसता गावासी अर्पुनी |देशाटनी  निघावे ||८६ ||
पहावी विशाल स्थाने मंदिरे |तीर्थे वने मुनी कुतीरे ||
अनासक्त वहावया मने शरीरे |चित्त लावावे सत्कार्यी ||९०||

अध्याय ४ था
म्हणोनी म्हणतो वैराग्यासाठी |घर सोडणे नको उठा उठी ||
त्यासाठी पाहिजे बुध्दी गोमटी |सेवाभावना त्याग वृत्ती ||५१||
यात्किती विरोधाभास आहे ते पहा

आपुले घर सोडूनी दयावे |गावची घर समजोणी राहावे ||
सर्व गावचे काम करावे |देव सेवा म्हणोनी ||५२ ||

आपुल्या मुलासारखीच सर्व मुले |होओत ऐसे मनी आणिले ||
त्यांच्या जोपासनेचे व्रत घेतले |तोची विरागी म्हणावा ||५६ ||
त्यासची म्हणावे विरागी |जो सर्व लोभाचा परित्यागी ||
सेवेसाठी कस्ट घे अंगी |नेहमीच लोकांच्या ||५८ ||

म्हणोनी हे चुकची आहे |तो सन्यास सन्यासची नोहे ||
वानप्रस्थची संन्याशी राहे |धोका न होय मुलाऐसा ||६४ ||
१०-२० ओव्या अशाच पद्धतीच्या आहेत ..........

झुडच्या झुंड मुले नेती|कोणी बैरागी संन्याशी करिती ||
आणि मग बोके होऊनी फिरती |लोकांमाजी ||६८ ||

सवे घेउनी आपुली पत्नी | सेवा करिती मिळोनी दोन्ही ||
हेची आहे वैराग्याची निशाणी |संसार संग सुटाया ||७८ ||
आणि कोणी निरासक्त झाला |संन्यास घेउनी वनी गेला ||
तोही नाही उपेगा आला | समाजाच्या ||८० ||८३|८४|८५|८६||

मानावे सकळांचे आभार |करावा परस्परांसी पूरक व्यवहार ||
असो सन्यासी वा गृहस्थ नर | सारखा अधिकार सर्वांचा ||११२ ||
||११३||११४ ||

*पुत्रधर्म पाळता पुत्र श्रेष्ट |पीत्रूधर्म पाळता पिता वरीष्ट ||

येथे म्हणावे श्रेष्ट कनिष्ट |कोणी कोणा ||११५ ||
पाया तेनेची पडावे ज्याने आपुल्या कर्मासी चुकावे ||
नाहीतरी प्रेम ठेवावे ||परस्परचे दोघांनी ||११६ ||
माता पित्याच्या पाया पडणे हे सुद्धा महाराजांना आवडत नाही

             अध्याय ६ वा
*ईश्वरे जग केले निर्माण | त्याचे कार्य अजुनी अपूर्ण ||
ते आपापल्यापरी कराया पूर्ण |सदबुध्दी दिली मानवा ||||

यासाठीच झाले अवतार | यासाठीच संत भक्तांचा व्यवहार ||
सुखी करीन अवघाची संसार |ब्रीद तयांचे  ||||

||१०|| गाव सुधारल्याशिवाय मोक्ष मिळणार नाही.....

            अध्याय ८ वा  
परंतु भयावाचुनी काही लोक |न एकतीच बोध सम्यक |
दंडांविन जैसे पशु देख |न चालतीच योग्य मार्गे ||१६ ||
त्यांना हित कोणी शिकवावे?|कोणी मूर्खाचे हृदय धरावे ||
म्हणोनी सत्तेने सरळ करावे |ऐसा मार्ग वाढवा ||१७ ||

              अध्याय ११ वा
म्हणोनी बहिष्कार ,असहकार |करोनी त्याचे तोडावे आधार ||
नाक दाबता तोंड सत्वर |उघडो लागे ||२८||

भिका-यास भिक दिली |त्याने दारू गाज्यात उडविली ||
सांगा काय दया घडली |एसियापरी ||४९||

जो चोरांनी नागवावा |गुंड लोकांनी फसवोनी ध्यावा ||
परस्त्रीने भोंदवावा |तो सात्विक कैसा ||६९ ||
              अध्याय १२ वा
**कधी काळी करिती भजन |घरोघरी बोलाव्या जाऊन ||
तुटका वीणा टाळ दोन | मृदंग गेला कामातुनी ||३५ ||
ऐसा झाला तालतीतंबा |विस्कळीत झाल्या कीर्तने सभा ||
म्हणती दया यावी रुक्मिणीवल्लभा |आपुली सुद्ध्ची नाही ||३८ ||

               अध्याय १३वा
व्याख्याने कीर्तने कलापथक |वादविवाद पोवाडे नाटके सात्त्विक |
एसी नित्य नवनवी करमणूक |गावी चालवावी सर्वांनी ||९६||
काय चालले जगामाजी |कळावे गावी सहजसहजी ||
म्हणोनी वृत्तपत्रे असावी ताजी |आकाशवाणीहि त्या ठाई ||१०४ ||
गुराढोरांची औेषधे जाणती |साहय दयावे त्या ग्रामिणाप्रती |
अनुभूत नुसखे लोकगीतादी किती |संग्रह त्याचे करावा ||१०८||
             अध्याय १४ वा
भाग्यवंताची उलटी व्याख्या | करणे शोभते का शहाण्यासारख्या ||
अरे,सकाळी उठ्नारासची सख्या | भाग्यवंताची म्हणावे ||३४ ||

पवित्र धूप, सुगंध सात्त्विक |तेणे वातावरण रोगनाशक |
रांगोळ्या आदि प्रसन्नकारक |स्वच्छ असावी जागा तरी ||७६||
कोणी आसने,पाट टाकावे |कोणी वाढावे,पाणी ठेवावे |
कोणी उदबत्ती,धूप लावावे |सुगंधसाठी ||७९||
राजस,तामस,सात्त्विक |भोजनाचे प्रकार अनेक |
त्यात आपली शक्त्ती पाहुनी सम्यक |पचेल तैसे करावे ||८८||
सर्व भोजनी उत्तम भोजन |ज्यात गोधृतदुग्धतक्रपण ||
समजावे अमृताचे सेवन | शरीरासाठी ||१२७ ||
                   अध्याय १८ वा
रास्ट्रसंत तुकडोजी महाराज
मंदिरी बैसोनि नाक दाबावे |त्यापेक्षा मार्गीचे काटे उचलावे |
दुखितासी प्रेमे पाणी पाजावे |हे श्रेष्ठ तीर्थस्नानाहूनी ||१९||

मोजके थोर पुरुष होऊनी जाती |इतरांची पातळी नयेची वरती
तव ती समाजाची प्रगती |कैसी म्हणावी जाणत्याने ?||७९||
काही असती जमीनदार |तेची गावचे अर्थभांडार |
त्याचा सर्व कारभार |सोपवावा लावावा माजुरांवरी ||८९||
            अध्याय १९ वा  

मुलगी बहु शिकली शालेमाझारी |परी स्वयंपाक करता न ये घरी |
काय करावी विद्याचातुरी ?|कामाविण लंगडी ती ||१६||

वडिलांने मुलगा नाही शिकविला |तोही पापांचा भागीदारी झाला |
जैसे जन्म देणे कर्तव्य त्याला |तैसेची शिक्षण देणे अगत्याचे ||४२||

ऐसे करिता होईल प्रगती |मुले उत्तम विद्यार्थी बनती |
थोर थोर उदयोगधंदे शिकती |पुढे पुढे ||६१||

आजचे सान सान बाल |उदया तरुण कार्यकाते होतील |
गावाचा पांग फेडतील |उत्तमोत्तम गुणांनी ||७३||
      
असोत गरिबी किंवा धनिक |मुलांस विदया शिकवाव्या अनेक |
गावाचे संपत्ति पुरवावी अधिक |याचा मार्गी ||१०७||

यातचि वेचावे खूप धन |करावे पूर्वजानचीया नावाचे दान |
विद्यालये झालीय पवित्र, संपन्न |गाव होईल स्वरपुरीं ||१०८||
               अध्याय २० वा

जिच्या हातीं पाळण्याची दोरी |तिच जगाते उदधरी|
एसी वनिर्ली मातेची थोरी |शेकडो गुरुहूनीही ||||

पुरुष सर्वकाही करी |परी बांधला राहे घराबाहेरी |
सर्व विचार घेवोनि आचरी |तरीच शांती त्यासही लाभे ||||        

काही पुराणी सांगितली दिशा |करावी स्त्रीजातीची उपेक्षा|
ती होती साधनाची शिक्षा | सर्वतोपरी ||१०||

 वैराग्यात न कथिले दोषविरोधा | नसली साधनात आपदा |
 कीर्तीत नसली काही निंदा |तरी पूर्ण नोहे साधना ||१२||

म्हणोनि इंद्रिय-विषय-दोषदर्शन |देहाचे नस्वरत्व,ओंगळपण |
हे वैराग्यार्थ केले कथन |व्यक्तिनिंदा नव्हे ती ||१३||

म्हणोनि विधीने सेवन उचित बोलिले |महिलेवीण विश्व न चाले |
काय होते पुरुषाने केले ?|अभद्र झाले घर सारे ||१७||

ते हे स्वतःसिद्ध मौलीपण |स्रीयेअंगी सहजचि घडण |
त्याचा विकास करावया पूर्ण |उत्तम शिक्षण पाहिजे ||२६||

स्त्री-दक्षता विचित्रची आहे |तेथे माणसाचे लाक्षचि न जाय |
तेवढे शिक्षण मुलाबाळांस ये |तरीच सोय संसाराची ||२७||

निरीक्षोनि जी जी घरे पहिली |तेथे सरसता अनुभवा आली |
चातुर्य-लक्षणे अधिक दिसली |महिलांमाजी ||३१||

परि यातून एकचि घ्यावे |स्त्रियांसि कोठे अव्हेरावे |
कोठे माऊली म्हणोनि पाया धरावे |ओळखावे हे तारतम्ये ||३७||

कोठे वागवावे मित्रभावे |कोठे देवी म्हणोनि पूजावे |
कोठे वैरिणीसारिखे बघावे |स्थलकालपात्रभेदाने ||३८||

जे जिकडे जातील तिकडे |स्त्रीचि आहे मागेपुढे |
अंतरी-बाहेर प्रकृतीचे वेढे |जीवापाडे पडले हे ||४०||

काय स्त्रियांनी नाही लिहिले वेद ?|नाही केला ब्राम्हवाद |
नाना विदयाकला-भेद |यांत प्रवीण कितीतरी ||५०||

हजारो स्त्रीया फुलाहूनी नाजूक |ब्रीदासाठी जाहल्या राख |
त्यांचे करावे तेवढे कौतुक |थोदडेची आहे ||५२||
स्त्रियेसारखी मोहिनी नाही |स्त्रियेसारखी वैरागिणी  नाही ||
स्त्रियेसारिखे मुलायम नाही | आणि कठोर रणचंडिका ||५३||
ऐसे असता दाबून ठेवावे |आजच्या युगे शोभा न पावे ||
जेथे समान हक्क असती बरवे |वर-वधूंना ||६६ ||
           अध्याय २१ वा
*विवाहा आधी परस्पराने |पाहावे दोघांनी निश्चयाने ||
विचारस्वातंत्र्य दोघाशी देणे | अगत्याचे ||११ ||
जुळता दोघांचे विचार |विकास पावेल कारभार ||
दोघांची उत्साह शक्ती अपार |कार्य करील सेवेचे ||१४||
सर्व धनांमाजी सुपुत्रधन |वाढली राष्टाचे गौरवस्थान |
म्हणोनीच वधु-वरांनी शोधून |लग्न करावे विचारे ||२५||
आकाशतील पाहती ग्रह |इकडे स्वभावी वेगळे दुराग्रह |
जीवनात वाढे जयांची द्रोह |ऐसे त्यांना न दिसती ||७८||
लग्नाचे अपार सोहळे |यासी विवाह म्हणो नये ||८२||
चार-पाच दिवस लग्न |लग्नात होती नाना विघ्न |
मोठेपणाचे विंडबन |कासयासी करावे ?||८५||
असोत अडी-अडचणी किती |साधीलिच पाहिजे तिथी |
एसी का ठेवावी प्रवृत्ति |रूढीबदध ?||८६||
प्रसन्न हवा,पाणी,ऋतु |हाची विवाहाच मुहूर्त |
बाकीचे झांजट फालतू |समजतो आम्ही ||८७||
              अध्याय २२ वा
त्याची विकृती शिगेस लागली |शरीरगात्रे विस्कळून गेली |
मग वाट पाहे आपुली |मूळच्या घराची ||१४||
परी प्रयत्न करोनि नाही जगला |शेवटी शरीर सोडोनि गेले |
समजावा देवाच्या स्वरूपी मिळाला |प्राणी आपुली ||१७||
मग ईस्वरास करावी प्रार्थना |त्यास शांती लाभो देवसदना |
भोजन ते भक्ती मरण ते मुक्ती असाच याचा अर्थ असावा ....
आमुच्या सुखदुःखाच्या भावना |न बाधोत तया ||१८||
*मृत्यूही सुमंगल समजावे |स्मशानयात्रेस सहयोग दयावा |
दिंडीघोषे मार्ग सुधारावा | जानाराचा ||२६||
मृतशरीराचे करोनि दहन |पवित्र करावे वातावरण |
गावे लावोनि ठेवावे समान |योग्य ठायी ||२९||
मृत शरीरास पितांबर |घरी नसल्यास विका घर |
दुख भोगा जन्माभर |ऐसे कोणी न करावे ||३०||
असेल तैसेचि वागावे |जुनेही वस्त्र स्वच्छ करावे |
खुशाल अंगी बांधोनी न्यावे |मृताचिया गरिबांनी ||३१||
     शास्त्र द्रोह
नवेची वस्त्र पाहिजे आणिले |
ऐसे शास्त्राने जरी सांगितले |
तरी आमुच्या घरचे कैसे चाले |
नाही ठाउके शास्त्रासी ||३२||
तुपावाचोनी नको भोजन |हे शास्त्रवाचन पाळतो कोण ?
मग मृतासीच तूप चोळाया जाण |शास्त्रवचन का सांगावे ?||३३||
सुतक धरण्याची प्रथा लाविली |ही तर शोकवृत्तीच दाविली |
आड येतील ती काढून टाकिली |पाहिजेत एसी बंधने ||३८||
याचा मूळ उददेश ऐसा होता |मृत देहाचा संसर्ग घडता |
रोगजंतु चढली सुश्रुषा करिता | म्हणोनि दूर राहावे ||३९||
परी बाप शंभर कोसंवरी मेली |मुलगा सुतक पाळी मुंबईला |
हा विपयार्स पाहिजे दूर केला |मूळ चित्ती धरोनि ||४०||
विवेके सावरोनी भावना |करावी तेराव्या दिवशी प्रार्थना |
सर्व लोकांसह जाणा |भजनानंद चाखावा ||४६||
सांगावी स्मृती म्हणोनि कहाणी |असेल तरी दान देवोनि
सेवा करावी त्या निमित्तानी |नसल्यास मनी खेद नको ||४७||


टिप्पण्या

  1. महाराजांनी त्यांच्या लिखाणातून ब्राम्हण आणि शास्त्र यांचा तिरस्कार केलेला नाही. शास्त्र हे लोकांच्या समोर चुकिच्या पद्धतीने ज्यांनी ज्यांनी मांडले त्यांच्यावर सडेतोड पणे न घाबरता टिका केलेली आहे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

क्षत्रिय माळी

स्वाध्याय अतिक्रमण

Anita Patil ||| अनिता पाटील विचार मंच: स्वाध्याय परिवाराला अस्पृश्यता परत आणायची आहे का?