पोस्ट्स

पाण्याचा शोध

छत्तीसगडच्या रायपूरमध्ये कृषी विभागात कार्यरत असलेले बी. डी. गुहा यांनी आश्चर्यकारक पद्धतीनं नारळाच्या साहाय्यानं रक्त गट शोधण्याची नवीन पद्धत शोधून काढलीय. कोणत्याही व्यक्तीला स्पर्श न करता केवळ १० सेकंदांमध्ये या पद्धतीनं व्यक्तीचा रक्तगट सांगता येतो. तसं पाहिलं तर आत्तापर्यंत नारळ केवळ मंदिरांमध्ये फोडण्यासाठीच वापरलं जायचं... याच नारळाच्या साहाय्याने एखाद्या व्यक्तीचा रक्त गटही सांगता येऊ शकतं, यावर कुणाचा विश्वासही बसणार नाही. पण, गुहा यांच्या दाव्यानुसार, याच नारळाच्या साहाय्याने सिलिंडर भरलेला आहे की रिकामा किंवा जमिनीखाली पाणी आहे किंवा नाही... किंवा जमिनीखालील सुरंग शोधून काढता येऊ शकतात. व्यक्तीचे आठ रक्त गट ए पॉझिटीव्ह, ए निगेटीव्ह, एबी पॉझीटीव्ह, एबी निगेटीव्ह, बी पॉझिटीव्ह, बी निगेटीव्ह, ओ पॉझिटीव्ह आणि ओ निगेटीव्ह असतात. गुहा यांच्या म्हणण्यानुसार, यातील पाच रक्त गट ए पॉझिटीव्ह, एबी पॉझीटीव्ह, बी पॉझिटीव्ह, ओ पॉझिटीव्ह आणि ओ निगेटीव्ह केवळ नारळाच्या साहाय्यानं ते ओळखू शकतात. इतर तीन रक्त गटांच्या बाबतीत शोध अजून सुरू आहे. वेगवेगळ्या रक्त गटांच्या बाबतीत न

आर्यभट

आर्यभट्ट (पाचव्या शतकात सूर्य- चंद्राचे वेध घेणारा महान भारतीय शास्त्रज्ञ) इ. स. ४७६                                                               (भारत)       भारताने आर्यभट्टाची जागतिक श्रेष्ठता कशी आजारामर केली ? भारतामध्ये पाचव्या शतकात एक अलौकिक खागोलशास्त्रज्ञ होऊन गेला , अशी सर्वसाधारण माहिती काही अभ्यासू भारतीयांना होती ; परंतु आर्यभट्टाचे संशोधन किती महत्वाचे होते यासंबंधी बहुसंख्य भारतीय पूर्णपणे अंधारात होते. प्राचीन काळापासून भारतीय शास्त्रज्ञांची एक अद्वितीय परंपरा होती व आहे ; पण सर्वसाधारण नागरिकांना या गोष्टींची काहीच कल्पना नसते! भारताने आपल्या पहिल्या उपग्रहाला ‘ आर्यभट्ट ’ हे नाव दिले , तेव्हा मात्र लोकांना याविषयी जाग आली व आर्यभट्टाने कोणत्या प्रकारचे शास्त्रीय प्रयोग केले व भारताचे नाव जागतिक शास्त्रज्ञांच्या मालिकेत कसे नेऊन बसविले हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. परंतु तरीही अशा जिज्ञासेचा पाठपुरावा करून संपूर्ण अथवा अंशतः माहिती मिळविण्याइतका उत्साह , तत्परता , किती भारतीयांमध्ये आहे , याचा उहापोह कारणाचे हे स्थळ नव्हे. मात्र खागोल विज्ञान

संख्या

संख्या https://mr.wikipedia.org/s/gf0 संख्या मोजणीसाठी वापरले जाणारे गणितीय एकक आहे. प्राचीन काळातील भारतीयांनी गणितासाठी वापरलेल्या चिन्हांना अंक म्हटले आहे. हेच अंक म्हणजे ( एक ते नऊ आणि शून्य ) सध्याच्या दशमान पद्धतीचे जनक आहेत. आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला. शून्य ही भारताची जगाला देणगी आहे. "आसा' या वैदिक काळाच्या प्रारंभी असलेल्या वायव्य भारतात राहणाऱ्या भारतीय गणितज्ज्ञांनी सर्वप्रथम दशमान पद्धतीची संकल्पना मांडली. अंकाच्या स्थानानुसार त्याची किंमत बदलेल या "आसा' यांनी मांडलेल्या संकल्पनेतून जगाला अंकलेखनाच्या दशमान पद्धतीची देणगी मिळाली. अशा पद्धतीने लिहिलेले आकडे हिंदासा नावाने ओळखले जाऊ लागले. साधारणतः इ.स. ५०० च्या सुमारास आर्यभट्टकृत दशमान पद्धतीचा प्रसार झाला. शून्यासाठी ख या शब्दाचा वापर केला गेला. नंतर त्याला शून्य असे संबोधले गेले. इंग्लिश पद्धतीत थाउजंड, मिलियन, बिलियन, ट्रिलियन, क्वाड्रिलियन अशा एक हजाराच्या पटीतील संख्यांनाच संज्ञा आहेत. भारतीय पद्धतीत दहाच्या सतराव्या घातापर्यंतचे अंक आहेत. विविध कोशांमध्ये किंवा पुस्त

शून्याचा शोध

श्रेष्ठ भारतीय शास्त्रज्ञांनी लावलेला शून्याचा शोध ही जगाला दिलेली एक अद्भुत भेट आहे हे जगातल्या विद्वानांनी मान्य केले आहे. सर्वाधिक लोक त्याचे श्रेय आर्यभट यांना देतात, तर बरेचसे लोक ते ब्रह्मगुप्त यांना देतात. काही लोकांच्या मते आर्यभटांच्या आधी होऊन गेलेले विद्वान पिंगला यांनी किंवा त्यांच्याही पूर्वी कोणा अज्ञात विद्वानांनी तर काहींच्या मते नंतरच्या काळातल्या भास्कराचार्यांनी शून्याचा शोध लावला. मग प्राचीन संस्कृत साहित्यामध्ये निरनिराळ्या संख्यांचे उल्लेख कसे येतात अशी शंका आपल्या मनात येते. रावणाला दहा तोंडे होती तर कौरवांची संख्या शंभर होती. विष्णुसहस्रनाम प्रसिद्ध आहे. कार्तवीर्यार्जुनाला हजार हात होते, तर सगराला साठ हजार पुत्र होते. गणेशाचे वर्णन "वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ" असे केले आहे आणि श्रीरामाची स्तुती "चरितम् रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम्" अशी करून "सहस्रनामतत्तुल्ल्यम्" अशी रामनामाची महती सांगितली आहे. पौराणिक कथा आणि स्तोत्रे यांमध्ये मोठमोठ्या संख्यांचे उल्लेख असलेली अशी असंख्य उदाहरणे आहेत. त्यांची रचना झाली तेव्हा
इमेज
भास्कराचार्य (दुसरा) महान भारतीय खगोलशास्त्रज्ञ भास्कराचार्य ह्याचा जन्म शके १०३६ ( इ. स. १११४ ) मध्ये झाला. भास्कराचार्याचे सर्व शिक्षण त्याचे वडील मोरेश्वर यांच्याजवळ झाले. ते स्वतः एक पारंगत खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांनी करणग्रंथ व जातकग्रंथ लिहिले. ज्ञानसंपन्न वडिलांच्या सानिध्यात भास्कराचार्यावर चांगले संस्कार झाले व तो विविध शास्त्रांत निष्णात झाला. भास्कराचार्य हा विज्जलवीड येथे राहणारा. सह्याद्री पर्वताजवळील व गोदावरीच्या उत्तरेकडील विज्जलवीड हे आपले वास्तव्यस्थान असल्याचे भास्कराचार्य म्हणतो. हे विज्जलवीड म्हणजे सध्याच्या अहमदनगरच्या ( याचे पूर्वीचे नाव अंबानगर असल्याचे काही संशोधकांचे म्हणणे आहे ) पूर्वेस ८० कि. मी. अंतरावरील बीड नव्हे, किंवा १८५७ मध्ये अकबराच्या आज्ञेवरून झालेल्या 'लीलावती' ग्रंथाच्या पर्शियन भाषेतील भाषांतरात उल्लेखिलेले सोलापूर जवळचे बेदरही नव्हे. ही दोन्ही गावे सह्याद्री पर्वताजवळही नाहीत व गोदावरीच्या उत्तरेसही नाहीत. पूर्व खानदेशात ( आता जिल्हा जळगाव ) च
महान प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ (भाग ३) Posted on जुलै 16, 2011 by anandghare महर्षी चरक, सुश्रुत व पतंजली हे प्राचीन काळातील भारतीय शास्त्रज्ञ, आर्यभट, भास्कराचार्यादी इतिहासकाळातील भारतीय शास्त्रज्ञ आणि कोपरनिकस, न्यूटन वगैरे पाश्चात्य शास्त्रज्ञ यांत मी भेदभाव करतो आहे असे वाटण्याची शक्यता आहे. मला तसे करणे भाग आहे. माझ्या मते एकाच फूटपट्टीने त्यांची थोरवी मोजता येणार नाही. मुख्य म्हणजे त्यांचे सांगणे आपल्यापर्यंत ज्या प्रकारे पोचले आहे त्यात महत्वपूर्ण फरक आहे. मागील लेखात नमूद केल्याप्रमाणे चरक, शुश्रुत व पतंजली यांनी ज्या आयुर्वेद व योगशास्त्र या विषयांवर ग्रंथरचना केली आहे ती शास्त्रे गुरुशिष्य किंवा पितापुत्रपरंपरेतून पिढी दर पिढी पुढे येत आजपर्यंत पोचली आहेत. रोगनिवारण आणि शरीर व मनाचे आरोग्य राखण्यासाठी प्रत्येक पिढीत त्यांचा उपयोग होत आला आहे. त्यातून मिळालेल्या अनुभवाने त्यातील सिध्दांत किंवा उपचार सिध्द झाले आहेत तसेच अनुभवातून ही शास्त्रे समृध्द होत गेली आहेत. आर्यभट, भास्कराचार्यादींचे खगोलशास्त्रांविषयीचे ज्ञान अशा प्रकारे त्यांच्या शिष

कथा शास्त्रज्ञांच्या: आर्यभट्ट

कथा शास्त्रज्ञांच्या: आर्यभट्ट : (पाचव्या शतकात सूर्य- चंद्राचे वेध घेणारा महान भारतीय शास्त्रज्ञ ) इ. स. ४७६                                                               (...